कागदाचा शोध कसा लागला? 1 कागद हे आले कोठून ? 👭कागदाच्या शोधाने मानवी इतिहासात क्रांती घडवून आणली. आज कागद हा व्यवहारात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पुस्तकांपासून चलनी नोटांपर्यंत सर्वत्र कागदाचा वापर केला जातो. 👭कागदाचा शोध इसवी सनाच्या दुसर्या शतकात लागला. इ.स.१०५ मध्ये त्साय लून या चीनी सरदाराने कागद तयार केल्याची नोंद आहे.वनस्पतींचे तंतू आणि गव्हाची देठे यांचे मिश्रण तुतीच्या झाडाच्या सालीबरोबर मिसळायचे आणि मग चांगले कुटून ते मिश्रण एका विणलेल्या कापडावर पातळसर पसरायचे, जेणेकरून एक हलका लिहिता येईल असा पृष्ठभाग तयार होईल. 👭कागद तयार करण्याची ही प्रक्रिया त्साय लूनने निर्माण केली. मात्र कापडावर पसरलेला कागद ताट राहत नसे. मग त्यात सुधारणा करून तो बांबू आणि लाकडावर पसरण्यात येऊ लागला.