शोध एअर कंडिशनरचा

 शोध एअर कंडिशनरचा                                               1

एअर कंडिशनर हे आले कोठून ? 

       😕प्राचीन काळातील रोमन लोक  उन्हाळ्यात आपली घरे थंड ठेवण्यासाठी घराशेजारच्या विहिरीतील पाणी घरांच्या भिंतीवर मारत असत. तर भारत वगैरे आशियाई देशांमध्ये उन्हाळ्यात गारवा निर्माण करण्यासाठी वाळ्यासारख्या गवताचा वापर करत. 


   😕आधुनिक एअर कंडिशनरचा शोध १९०२ मध्ये लागला. यातही घराचे तापमान थंड ठेवण्याचे तत्वच वापरण्यात आले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील विलीस कॅरीयर या शास्त्रज्ञांनी एअर कंडिशनिंग च्या मुलभूत तत्वाचा विकास केला. त्यांनी तयार केलेला पहिला एअरकंडिशनर एका छापखान्यात बसवण्यात येणार होता. या छापखान्यामध्ये तापमान आणि हवेतील आद्रता सतत होणाऱ्या बदलामुळे शाईच्या नळ्या रेषेबाहेर जात असत. त्यामुळे रंगीत छपाई योग्य तन्हेने होत नसे. ही समस्या दूर करण्यासाठी कॅरीयरला पाचारण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog