कागद हे आले कोठून ?
कागद हे आले कोठून ? 2
भारतातील कागदाचा वापर
😀 त्याकाळी रेशमी कपडा वाराही कागद पसरला जात असे. हा कागद सर्वात महागडा असे. त्साय लूनचा हा शोध चीनी राजघराण्यांनी गुप्त ठेवला. अखेर सातव्या शतकात कागद करण्याचे तंत्र जाहीर होऊन जपान आणि कोरियात पोहोचले.
😀 ७५१मध्ये झालेल्या एका युद्धात अरब सैनिकांनी काही चीनी कागद व्यापाऱ्यांना कैद केले. त्यांच्याकडून कागद तयार करण्याचे तंत्र अरब जगतात पोहोचले आणि तेथून ते युरोपात बाराव्या शतकात आले.
😀 युरोपात कागद तयार करण्याचीकला प्रथम स्पेनमध्ये रूजली. भारतात प्राचीन काळापासून लिहिण्यासाठी ताडपत्र आणि भूर्जपत्राचा वापर होत असे. इ.स.पू.३२७ च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कस यांनी हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करत अशी माहिती लिहून ठेवली आहे.


Comments
Post a Comment