फुग्याचा शोध कसा लागला? wiki-searcher.blogspot.com › search
फुग्याचा शोध कसा लागला?
😕लहान मुलांना अगदी मनापासून आवडणाऱ्या फुग्याचा शोध लावला मायकेल फॅराडे या शास्त्रज्ञाने.
😕फॅरेडेची रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये केमिकल असिस्टंट म्हणून नेमणूक झाली होती आणि त्या पदावर असताना त्याने अनेक प्रयोग तेथे केले.
😕क्लोरीन आणि वायूंचे स्वरूप हा त्याच्या अभ्यासाचा विषय होता. हायड्रोजन वायूच्या घटकांचा अभ्यास करताना फॅरॅडेने पहिला रबराचा फुगा तयार केला.
😕रबराचे दोन तुकडे एकत्र करून त्याची पिशवी तयार केली जातअसे आणि त्यात हायड्रोजन भरून त्याचा फुगा तयार होई. हा फुगा गुरूत्वाकर्षणाचे नियम तोडून वरवर जात असे. या फुग्यामुळे फॅरॅडेला हायड्रोजन वायूच्या घटकांचा अभ्यास करणे शक्य झाले.
😕फॅरॅडेचा हा शोध १८२४ मध्ये लागला. त्यानंतर एकच वर्षाने थॉमस हँकॉक या रबर उत्पादकाने या फुग्यांचेही उत्पादन सुरू केले.



Comments
Post a Comment