आधुनिक रणगाडे
आधुनिक रणगाडे
#आधुनिक रणगाडे हे आले कोठून ?
💭फोस्टर कंपनीने १९१५ मध्ये 'लिटर बिली' या नावाने एक छोटा रणगाडा विकसित केला. पुढे याच रणगाड्याचे रूपांतर त्यांनी मोठ्या रणगाड्यामध्ये केले. त्याचे नाव होते 'बिग बिली'.
💭पहिले जागतिक महायुद्ध संपेपर्यंत अनेक देशांनी रणगाड्यांचे उत्पादन सुरू केले होते.आताच्या आधुनिक रणगाड्यांमध्ये ज्या सोयी पाहायला मिळतात त्या सर्व सोयी त्याकाळात फ्रान्स आणि ब्रिटनने बनवलेल्या रणगाड्यांमध्ये होत्या.
💭दुसऱ्या महायुद्धामध्ये या आधुनिक रणगाड्यांचा वापर केला गेला. हे रणगाडे ताशी ६५ किलोमीटर इतक्या वेगाने धावणारे होते.
💭रणगाड्यांवर जाड पोलादी आवरण असते. त्यांना अनेक चाके असतात. या चाकांवर एक विशिष्ट प्रकारची चेन फिरत असते. ही चाके असमान जमिनीवरून वेगाने जाण्यासाठी रणगाड्याला मदत करतात.
(उत्तरार्ध)



Comments
Post a Comment