पाऊस मोजण्याचे यंत्र
पाऊस मोजण्याचे यंत्र
# पाऊस मोजण्याचे यंत्र हे आले कोठून ?
💭पावसाचे मोजमाप करण्याचे तंत्र मध्ययुगात चीनमध्ये विकसित झाले. जांग योग सील नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने हे तंत्र विकसित केले.
💭यात १७ इंच उंच आणि ७ इंच जाडीचे एक लंबवर्तुळाकार भांडे दगडावर बसवले जात असे. त्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची खोली तपासण्यासाठी त्याला एक मोजपट्टी बसवण्यात आली होती.
💭या पद्धतीने पावसाचे मोजमाप करणे शारीरिक कष्टाचे काम असे. या तंत्रात पुढे १६६२ मध्ये ख्रिस्तोफर रेन या शास्त्रज्ञाने सुधारणा करून त्याला पूर्णपणे यांत्रिक बनवले.
💭या यंत्रात दोन संतुलित बादल्या ठेवल्या होत्या. विशिष्ट प्रमाणात पाणी पडले की बादलीतून आपोआप इशारा मिळत असे. मग त्याचे मोजमाप केले जाई. रेनच्या या गॉजवर आधारितच आज पाऊस मोजण्याची यंत्रे तयार केली जातात.



Comments
Post a Comment