सर्कशीची वाटचाल
सर्कशीची वाटचाल
# सर्कशीची वाटचाल कशी झाली ?
😀अस्टलेच्या मनोरंजक कसरतीच्या कलावताचे पथक असणा-या सर्कशीचा प्रसार युरोपातील अन्य देशांत आणि अमेरिकेत झाला.जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळात फिलाडेल्फिया अमेरिकेत पहिली सर्कस सुरू झाली.
😀पूर्वी फक्त घोड्यांच्या कसरतीचे प्रयोग असत. त्याला विविध पशु-पक्ष्यांकडून करून घेण्यात येणाऱ्या कौशल्यपूर्ण कामांची जोड मिळाली. भारतात सर्वप्रथम अंकलकोपचे विष्णुपंत छत्रे यांनी १८८३ मध्ये पहिली सर्कस सुरू केली.
😀पूर्वीच्या काळी तासगाव हे सर्कशीसाठी प्रसिध्द होते. तेथील परशुराम माळी, शेलार यांच्या सर्कशी खूप गाजल्या. सोव्हिएत रशियानेही सर्कस प्रकाराला भरपूर प्रोत्साहन दिले. रशियात सर्कशीसाठी कायमस्वरूपी भव्य प्रेक्षागृहे असून तेथे नियमित सर्कशीचे खेळ होतात.




Comments
Post a Comment