जहाजांचा धक्का

 जहाजांचा धक्का

 #जहाजांचा धक्का नाव हे आले कोठून ?




💭भाऊचा धक्का हे नाव तुम्ही ऐकलें  असेल.  धक्का म्हणजे जहाजे नांगर टाकून थांबवली जातात ती जागा. भाऊचा धक्का ब्रिटिशांनी बांधला; पण जगातील पहिला धक्का इ.स.पू. २५०० वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीतील लोकांनी बांधल्याची नोंद आढळते.


💭गुजरातच्या किनाऱ्यावरील लोथल इथे तो बांधण्यात आला होता. या धक्क्याचे अवशेष १९५५ मध्ये सापडले. त्याचा आकार असमांतर चौकोनी होता आणि त्याच्या भिंती भाजलेल्या विटांनी बांधल्या होत्या.


💭या धक्क्याची पूर्व-पश्चिम लांबी. ४० यार्ड (३७ मीटर) इतकी होती; तर उत्तर दक्षिण लांबी २४ यार्ड (२२ मीटर) होती. अधिक पाणी वाहून जाण्यासाठी तसेच काठांची धूप होऊ नये यासाठी बाजूने जागा सोडण्यात आली होती. या धक्क्यात एका वेळी दोन जहाजे थांबवण्याची, व्यापारी बोटींतून माल उतरवण्याची आणि चढवण्याची सोय होती.



💭इ.स.पू. २२०० मध्ये लोथलमध्ये आलेल्या महापुरात हा धक्का वाळूखाली गाडला गेला. १९५० च्या दशकात या भागात उत्खनन झाले तेव्हा हे बांधलेले बंदर साऱ्या जगासमोर आले.







Comments

Popular posts from this blog