सुईचा शोध
सुईचा शोध कसा लागला?
#सुई अली कोठून ?
😀आपण परिधान करत असलेल्या कपड्यांच्या निर्मितीमध्ये सुईचा वाटा महत्त्वाचा आहे. सुईचा शोध लागला नसता तर आपण शिवलेले कपडे वापरू शकलो नसतो.
😀सुईच्या शोधाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही; मात्र प्राचीन काळी मानवाने आपले शरीर झाडांच्या सालींनी आणि चामड्यांनी झाकण्यास सुरवात केल्यानंतर दोन तुकड्यांना शिवण्यासाठी त्याने सुईसारखी एखादी वस्तू बनविली असावी.
😀प्राचीन काळी हाडे, हस्तीदंत, लाकूड काटे आदींपासून सुई बनविण्यात आली होती. या सुयांच्या एका टोकाला छिद्रे होती.
😀चीनने सर्वप्रथम पोलादापासून सुई बनविली. तेथून सुया युरोपमध्ये पोहोचल्या.जर्मन चौदाव्या शतकात पोलादाच्या सुयांचे उत्पादन सुरूझाले. सुई ही लहान वस्तू असली तरी उत्पादन होत असताना २० कर्मचाऱ्यांच्या हाताखालून जाते.



Comments
Post a Comment