शोध फूड प्रोसेसरचा
शोध फूड प्रोसेसरचा
# फूड प्रोसेसर हे आले कोठून ?
😀घरोघरी आढळणाऱ्या फूड प्रोसेसरचा शोध लावण्याचे काम एका शास्त्रज्ञाने नाही तर सेल्समनने केले आहे.
😀पिएरे वेर्दन हा फ्रेंच सेल्समन स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तू विकत असे. त्याच्या लक्षात आले की त्याच्या ग्राहकांचा बराचसा वेळ विविध भाज्या आणि पदार्थ चिरण्यात, कापण्यात आणि खिसण्यात जातो.
😀या बाबतीत खूप काही करण्यासारखे आहे असे त्याला वाटले आणि तो कामाला लागला. त्याने त्याच्या यंत्राचे प्रारूप तयार केले आणि तेच फूड प्रोसेसरचे बेसिक डिझाईन बनले.
😀त्याच्या या यंत्रात प्लास्टिकचे एक गोलाकार मोठे भांडे होते, त्यात फिरणारे पात बसवण्यात आले होते. हे पाते वेगाने फिरत भांड्यातील भाजीचे प्रमाणशीर तुकडे करत असे. या भांड्याच्या झाकणावर एक नळकांडे बसवलेले असायचे. त्यातून जो पदार्थ चिरायचा आहे तो भांड्यात टाकता येत असे.
😀आज फूड प्रोसेसरच्या तंत्रज्ञानात प्रगती झालेली असली तरी या डिझाईनमध्ये फारसा फरक पडलेला नाही.


Comments
Post a Comment