सर्कशीची सुरवात
सर्कशीची सुरवात
#सर्कशीची सुरवात हे कोठून झाली ?
😀सर्कशीची सुरवात रोमन याकाळात युरोप मध्ये झाली. सर्कल म्हणजे वर्तुळाकार रिंगण या शब्दावरून सर्कस हे नाव प्रचलित झाले.
😀त्या काळात सर्कस गोलाकार मैदानामध्ये भरत असे. त्यामध्ये घोड्यांच्या शर्यती, प्राण्यांची झुंज, कुस्त्या, घोडेस्वारांचे कसरतीचे प्रयोग असे चित्तथरारक मनोरंजक प्रकार प्रेक्षकांपुढे सादर केले जात असत.
😀रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर अठराव्या शतकापर्यंत सर्कस विस्मरणात गेली होती. इंग्लंडमधील फिलिप अस्टले या निवृत्त लष्करी अधिका-याने १७६८ मध्ये घोडयांच्या कसरतीचे जाहीर प्रयोग सुरू केले ।
😀हे प्रयोग लोकप्रिय करण्यासाठी त्याला अन्य कसरती करणारे कलावंत, विचित्र पोषाख परिधान केलेले विदूषक आणि ब्रास बँड यांची जोड दिली. हा प्रकार सर्कशीचा पुनर्जन्म मानला जातो.




Comments
Post a Comment