टाईपरायटरचा शोध
टाईपरायटरचा शोध
#टाईपरायटर हे आले कोठून ?
💭आजच्या संगणकयुगामध्ये टाईपरायटर फारसे पाहायला मिळत नाहीत; पण काही वर्षांपूर्वीपर्यंत टाईपरायटरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. •टाईपरायटरच्या रुपातील पहिले यंत्र १७१४ मध्ये तयार केले गेले. हेन्री मिल या ब्रिटिश संशोधकाने हा प्रयत्न केला.
💭१८२९ मध्ये अमेरिकेतील विल्यम बर्ट या संशोधकाने टायपोग्राफर नावाचे यंत्र बनवले; पण त्याचा वेग खूप कमी होता. चार्लस थर्बर यांनी १८४३ मध्ये बनवलेले यंत्रदेखील खूप सावकाश चालायचे. ख्रिस्तोफर लॅथम शोल्स या संशोधकाने १८६७ मध्ये टंकण यंत्राचा एक उत्कृष्ट नमुना तयार केला.
💭न्यूयॉर्क येथील रेमिंग्टन अँड. सन्स या कंपनीने १८७५ मध्ये या यंत्राचे उत्पादन सुरू केले आणि रेमिंग्टन या नावाने पहिला टाईपरायटर विक्रीसाठी बाजारात दाखल झाला.



Comments
Post a Comment