पहिला रंगीत चित्रपट

 पहिला  रंगीत चित्रपट

 # रंगीत चित्रपट हे आले कोठून ?



💭'द वर्ल्ड, द फ्लेश अँड द डेव्हिल' हा ब्रिटिश मूकपट होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जगातील पहिला पूर्ण लांबीचा रंगीत चित्रपट होता. हा चित्रपट ९ एप्रिल १९१४ रोजी प्रदर्शित झाला. 







💭तो एका नाटकावर आधारित होता. आता या चित्रपटाची रिळे गहाळ झाली आहेत. हा चित्रपट अडिटिव्ह रंग आणि किनेमॅकलर प्रक्रियेचा वापर करून तयार करण्यात आला होता.  या चित्रपटाची कथा वेगळी होती.   


 💭साऱ्या जगावर चिडलेली एक महिला गरीब कुटुंबातील आणि श्रीमंत कुटुंबांतील नवजात बाळांची अदलाबदल करायची ठरवते. पण तो प्रयत्न यशस्वी होत नाही; पण त्या कुटुंबांना मात्र बाळांची खरेच अदलाबदल झाली आहे, असे वाटते. या संपूर्ण गैरसमजामुळे झालेली वाताहत चित्रपटात दाखवण्यात आली होती.










Comments

Popular posts from this blog