खुर्चीची संकल्पना 2
खुर्चीची संकल्पना आली कोठून ?
👭साधारण ४८०० वर्षापूर्वी इजिप्शिअन लोंकांनी खुर्चीचा आविष्कार केला. माहीत असलेली सर्वात प्राचीन खुर्ची ही इजिप्तमध्येच आढळून आली.
👭ही खुर्ची लाकूड आणि हस्तीदंतापासून तयार करण्यात आली होती. या खुर्चीचे पाय प्राण्यांच्या पायासारखे होते, तसेच यावर कोरीव काम करण्यात आले होते. ती रंगवलेलीही होती. या खुर्चीवर कातडी किंवा कापड आच्छादन घातलेले असे.

👭 प्राचीन ग्रीकमध्येही खुच्यांचा वापर होत असे. पुढे मध्युगात खुर्चीत अनेक सुधारणा घडून आल्या. मध्ययुगात सुरवातीला खुर्चीची पाठ आणि हाताकडील बाजू उंच फळ्यांच्या असत. कधीकधी त्यावर छत्रही असे. दगडाच्या आणि धातूच्या खुर्च्याही तयार केल्या जात.
👭मध्ययुगात भारतात बनवलेल्या वेताच्या खुर्च्या पोर्तुगीजांनी युरोपामध्ये नेल्या.नंतरच्या काळात खुर्चीचे अनेक प्रकार विकसित झाले. पण खुर्चीची मूळ संकल्पना तशीच राहिली आहे.

Comments
Post a Comment