सोडा वॉटर कसे बनले?

सोडा वॉटर कसे बनले?
सो डा वॉटर हा प्रकार इंग्लंडमधून संपूर्ण जगात पसरला. जोसेफ प्रिस्ले हे त्याच्या जनकाचे नाव. हा शास्त्रज्ञ इंग्लंडमधील यॉर्कशायर येथील एका मद्याच्या कारखान्याजवळ राहत होता. किशोरवयात जोसेफ या कारखान्यात जात असे. तेथे त्याने आंबवलेल्या धान्यावर कार्बन डायऑक्साईड तरंगताना पाहिला होता.
पुढे १७७१मध्ये त्याने पाण्याने भरलेल्या लहान बरण्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू इंजेक्शनद्वा
रे सोडला. त्याला त्याने 'फिक्स्ड एअर' असे नाव दिले. तीस मिनिटे ते चांगले ढवळले, जेणेकरून पाण्याच्या आकारमानात कार्बन डायऑक्साईड मिसळून जाईल आणि अशा प्रकारे त्याने पिण्यायोग्य असे कार्बोनेटेड किंवा सोडा वॉटर तयार केले.
१७७२मध्ये त्याने सोडावॉटरचे फायदे सांगणारे एक पुस्तक लिहिले. १७७४ मध्ये त्याने ऑक्सिजनचा शोध लावला.


Comments
Post a Comment