फुटबॉलचा इतिहास
फुटबॉल हा खेळ कसा आला?

😑एकोणिसाव्या शतकात फुटबॉलचा शोध लागला असे म्हटले जात असले तरी प्राचीन व मध्ययुगीन ब्रिटनमध्ये हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जात होता.
😑बाराव्या शतकापासून फुटबॉल हा खेळ प्रचलित झाला. 'हिस्ट्री ऑफ लंडन' या पुस्तकामध्ये श्रोव्ह ट्युजडे या धार्मिक सणाच्या दिवशी फुटबॉल खेळला गेल्याचा उल्लेख आढळतो.
😑आजच्या काळात खेळल्या जाणाऱ्या आधुनिक फुटबॉलचे' जन्मस्थानही इंग्लंड हेच आहे.
😑२६ जुलै १८६३ रोजी फुटबॉलच्या नियमांना अधिकृत रुप देण्यासाठी लंडनमध्ये फुटबॉल असोसिएशन ची स्थापना करण्यात आली.
😑भारतामध्ये खेळला जाणारा फुटबॉल हा प्रामुख्याने सॉकर या प्रकारचाच खेळ आहे. हा खेळ ब्रिटिशांनी भारतात
आणला. भारतात प्रथम कोलकात्यामध्ये फुटबॉल खेळला गेला आणि त्यानंतर तो लोकप्रिय झाला.


Comments
Post a Comment