खुर्चीचा शोध कसा लागला?
खुर्चीचा शोध कसा लागला? 1
खुर्ची ही आली कोठून?
⬜दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या शोधाविषयी आपल्याला कुतुहल असते. खुर्ची ही त्यापैकीच एक. आपल्याकडे प्राचीन ग्रंथांमध्ये आसनांचे उल्लेख आढळतात. राजे आणि देवदेवता यांच्या आसनांचा उल्लेख आढळतो. या आसनांना सिंहासन म्हणत.
⬜वैदिक वाङ्मयात आसंदी किंवा आसंदिका या चौरंगासारख्या आसनाचा उल्लेख आहे. हे आसन खैर वा औंदुबरच्या लाकडापासून तयार केले जात असे. त्याचे आकारही विविध असत; पण खुर्ची हा आसनाचा प्रकार आला आहे तो इजिप्तमधून.

⬜प्राचीन काळी आदिमानवाने तोडलेल्या झाडाचे खोड, उंच दगड वगैरेंचा उपयोग बसण्यासाठी केला असावा. त्यातून खुर्ची संकल्पना उत्क्रांत झाली असावी. प्राचीन इजिप्शियन लोकांना स्टूल माहित होते. त्या काळात त्यांनी विविध प्रकारची आणि डिझाईनची स्टूल्स तयार केली होती.


Comments
Post a Comment