घंटेची निर्मिती कधी झाली?

.
घंटेची निर्मिती कधी झाली?
घंटा हे आले कोठून?



घं टेची निर्मिती आशियातच झाली असावी, असे शास्त्रज्ञांना वाटते. प्रथम ब्रांझ युगात घंटा तयार झाल्याचे उल्लेख आढळतात.

घंटीचा आकार पालथ्या पेल्यासारखा असतो. त्यात एक लोळी लोंबत असते. ही लोणी घंटेच्या काठावर आपटली की त्यातून नाद निर्माण होतो.

इतिहासकारांच्या मते, घंटेचा शोध चीनमध्ये इ.स.पूर्व ३९५० ते १७०० या काळात लागला असावा. त्या काळातील चीनी लोकांनी लिंग्स नावाची एक वस्तू तयार केली होती. हीच मानवी इतिहासातील पहिली घंटा होय असा संशोधकांचा दावा आहे
 युरोपातील प्राचीन काळापासून प्रार्थना मंदिरांमध्ये घंटा बसवल्या जात असत.

भारतात प्राचीन काळापासून घंटेचा वापर होतो. भारतात घंटेचे वज्रघंटा, गरुड घंटा असे वेगवेगळे प्रकार आहेत.
अलिकडच्या काळात घंटेचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत. हाताने वा स्प्रिंगच्या साहाय्याने वाजणारी टेबलावर ठेवण्याची घंटा, पडद्यांना लावलेली घंटा, दरवाजावर लावली जाणारी बेल किंवा विद्युत घंटा हे त्याचे आविष्कार आहेत. 
०१९३०नंतर इलेक्ट्रॉनिक्सचा विकास झाल्याने घंटेतही अनेक वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले. संगीतातही घंटेचा अतिशय चांगल्या त-हेने वापर होतो.







Comments

Popular posts from this blog