पॅराशूटचा शोध कसा लागला?

पॅराशूटचा शोध कसा लागला?

पैराशूट  हे आले कोठून?


💭राशूटच्या शोधाचे श्रेय लुई-सेबेस्टियन लेनॉरमैंड या फ्रेंच संशोधक आणि डॉक्टरकडे जाते. २६ डिसेंबर १७८३ रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील माँपेलिऍ  ऑब्झर्वेटरीच्या तळभागात गोळा झालेल्या लोकांसमोर त्याने या ऑब्झर्वेटरीच्या मनोऱ्यावरून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली.

💭या पॅराशूट जोडलेल्या एका एका लाकडी चौकटीला घरून लीनॉरमॅडने उडी मारली. हे पहिले पॅराशूट हे पॅराशूट चौदा फूट लांबीचे होते. चीनमध्ये पाठवण्यात आलेल्या फ्रेंच राजदूताने लिहून ठेवलेल्या अनुभवांतून लेनॉरमंडला पॅराशूट तयार करण्याची प्रेरणा मिळाली असावी. कारण चीनमध्ये छत्रीच्या साहाय्याने उडी मारण्याच्या कसरतपटूंबद्दल त्याने लिहून ठेवले होते.

💭इ.स.पू.९०च्या सुमारास काही कैदी तुरूंगाच्या मनोऱ्यावरून गोलाकार शिरस्त्राणयांच्या आधारे उडी मारून निसटले, असा उल्लेख चीनी दंतकथेत आढळतो. 
💭१४८५ मध्ये लिओनाडों दा विंची यानेही पिरॅमिडच्या आकाराच्या पॅराशूटचे स्केच काढले होते. पण त्याची ही कल्पना प्रत्यक्षात आल्याचे पुरावे आढळत नाहीत.

Comments

Popular posts from this blog