'एफएम' ची सुरवात
'एफएम' ची सुरवात 1
#एफएम हे आले कोठून ?
😕रेडिओचे पहिले प्रसारण विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळात झाले. हे प्रसारण अँम्प्लीट्यूड मॉड्यूलेशन (एएम म्हणजे लहरींमधील अंतरातील बदल)च्या नियमांवर आधारित होते.
😕 रेडिओ लहरींचे विशिष्ट फ्रिक्वेन्सी प्रसारण होत असे आणि ऐकणाऱ्या व्यक्तीला ऐकायला येणारा आवाज व्यवस्थित येत नसे. त्यात अनेक अडथळे असत. बरेचदा नुसती खरखरच ऐकायला येत असे.
😕विशिष्ट ठिकाणी रेडिओ ठेवल्यावरच नीट ऐकू येई. एएम रेडिओतील ही समस्या१९७० पर्यंत तशीच होती, तरीही ए एम रेडिओ ची लोकप्रियता कमी झाली नव्हती.
😕१९३३ मध्ये एडविन एच. आर्मस्ट्राँग या अमेरिकन शास्त्रज्ञांनी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन चा वापर करून रेडिओ प्रसारण करण्याच्या एका पर्यायी पद्धतीचे पेटंट घेतले. यालाच एफएम असे म्हणतात.


Comments
Post a Comment