लिफ्टचा इतिहास

लिफ्टचा इतिहास

लिफ्ट हे आले कोठून ?



◻️लिफ्टचा शोध आधुनिक  वाटत असला तरी अगदी  हजारो वर्षापूर्वी अवजड वस्तू वर नेण्यासाठी लिफ्टचा वापर केला जात होता.


◻️ ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांनी इ.स.पूर्व २३६ साली लिफ्ट बनवल्याचे लेखी दाखले आहेत. एका मोठ्या ड्रमला दोरी गुंडाळून त्याच्या एका बाजूला वस्तू ठेवण्यासाठी साचा केलेला असे आणि दुसऱ्या बाजूने मनुष्यबळाचा वापर करून ओढून ती लिफ्ट खाली-वर घेतली जात असे.

◻️१७४३ साली १५व्या लुईस राजाने 'फ्लाईंग टेबल' नामक लिफ्टसारखाच प्रकार वापरला   होता. हे टेबल राजाच्या जेवणाच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर असे आणि बटण दाबताच अन्नपदार्थांनी सजलेला हा टेबल वरून मेजवानीच्या खोलीत येत असे.


◻️१८५२ साली एलिशा ग्रेव्हज यांनी एक सुरक्षित लिफ्ट तयार केली. तशाच लिफ्ट आज सर्वत्र वापरल्या जातात. काळानुरुप त्यामध्ये बदल होत गेले.




Comments

Popular posts from this blog